कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्यासह इतर राज्यांतील उमेदवारांना संधी
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावमध्ये 27 जूनपासून अग्निवीर भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी स्टेडियमवर महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील उमेदवारांची भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे करण्यात आले आहे.
27 जून रोजी खेळाडूंसाठी शारीरिक चाचणी होणार आहे. 28 रोजी केवळ महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी भरती होईल. यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई येथील उमेदवारांना सहभागी होता येईल.
29 रोर्जी नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, धाराशिव पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमधील उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल.
कर्नाटक व आंध्रप्रदेश येथील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. २ जुलै रोजी ट्रेड्समन पदासाठी भरती होईल. ३ जुलै रोजी ऑफीस असिस्टंट (क्लर्क). स्टोअर किपर टेक्निकल या पदांसाठी केवळ मराठा इन्फंट्रीच्या माजी सैनिकांना संधी देण्यात येईल. ८ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
अग्निवीर जीडी, ट्रेड्समन व क्लर्क पदासाठी १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जीडी पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. क्लर्क पदासाठी बारावी उत्तीर्ण तसेच ट्रेड्समन पदासाठी दहावी व आठवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. खेळाडूंना राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील विजेते प्रमाणपत्र आणावे लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा इन्फंट्रीतर्फे करण्यात
१ जुलै रोजी मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, आले आहे.
Army 🪖