खानापूर

ट्रॉलीच्या धडकेत शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू

कारदगा: रंगपंचमी खेळताना दुर्दैवी घटना घडली असून, ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून प्रज्वल पाटील बाळासाहेब पाटील (वय 9) या शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बारवाड येथे बुधवारी सकाळी घडली.

रंगपंचमीनिमित्त गावातील मुले आणि युवक रस्त्यावर रंगांची उधळण करत होते. सकाळच्या सुमारास मांगूरहून कारदग्याकडे उसाची मळी घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या मागील चाकाखाली प्रज्वल सापडला. चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर प्रज्वलचा मृतदेह निपाणी येथील गांधी रुग्णालयात हलवण्यात आला. या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यात झाली असून, चिकोडीचे सीपीआय विश्वनाथ चौगुले आणि सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

प्रज्वल हा इयत्ता तिसरीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते