खानापूर
जांबोटी-कणकुंबी महामार्गावर कंटेनर-दुचाकीचा अपघात, एक ठार
खानापूर: जांबोटी-कणकुंबी महामार्गावरील आमटे क्रॉसवर गुरूवारी, 16 तारखेला सकाळी गोव्याहून बेळगावकडे येणार्या कंटेनरने बेळगावहून गोव्याकडे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकजण ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केए.२२ डी ८९६० क्रमांकाच्या कंटेनरने केए ४९ ई.बी. १६०३ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकी स्वार निखिल बाळगौडा पाटील (वय २१) याला तोंडाला आणि छातीला गंभीर जखम झाली. त्याला उपचारासाठी बेळगावला नेताना रस्त्यातच मृत्यू झाला. मागे बसलेला निखिल रमेश बेळंकुड (वय २०) गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच सीपीआय मंजुनाथ नायक आणि पीएसआय एम. गिरीष घटनास्थळी दाखल झाले.
