खानापूर

होनकल जवळ अपघात, एक गंभीर जखमी

खानापूर: बेळगाव-पणजी महामार्गावरील होनकल क्रॉसजवळ सोमवारी (दि. २०) दुपारी कारने दुचाकीला धडक दिल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे.

या अपघातात तिंबोळी रामनगर येथील शंकर पाऊसकर (वय ३६) गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावरील माहिती:
होनकल क्रॉसजवळील बेळगाव-पणजी महामार्गावर दुचाकीस्वाराने दुभाजक ओलांडून रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी जीजे १८ बीडी १४५६ क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे दुचाकीस्वार शंकर पाऊसकर कारसमोर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन अतिरक्तस्त्राव झाला.

अपघातानंतर शंकर पाऊसकर यांना तातडीने खानापूर सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना बेळगाव येथे हलविण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?