पिरणवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीसाठी 51 हजारांची देणगी
खानापूर : खानापूर तालुक्यातील शेंदोळी खुर्द येथील व सध्या गोवा येथे वास्तव्यास असलेले दानशूर व्यक्ती श्री. जोतिबा वीर यांनी पिरणवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीच्या बांधकामासाठी 51 हजार रुपयांची देणगी दिली आहे.

श्री. जोतिबा वीर हे गोवा येथे ‘दीपज्योती कन्स्ट्रक्शन’ या माध्यमातून आपला व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत असून, सामाजिक कार्यातही ते सातत्याने पुढाकार घेत असतात. खानापूर तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी त्यांनी वेळोवेळी सढळ हस्ते मदत केली आहे.

पिरणवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीचे काम सुरू असल्याचे समजताच त्यांनी तत्काळ 51 हजार रुपयांची देणगी जाहीर करून आपला सहभाग नोंदविला.
याबद्दल मंडळाच्या वतीने श्री. जोतिबा वीर यांचे आभार मानण्यात आले.
