गुंजी: नवसाला पावणारी देवी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री माऊलीदेवीच्या यात्रेत दरवर्षी हजारो भाविक हजेरी लावतात. यंदाही भाविकांची मोठी गर्दी उसळली असून भाविकांसाठी अनेक मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. याचप्रमाणे आज, शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 8 वाजता भव्य आकर्षक “जल्लोष ऑर्केस्ट्रा कोल्हापूर” या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात लोकसंगीत, मराठी गीते, हिंदी चित्रपटगीतं, कव्वाली, भजन, लावणी आणि विनोदी फटके यांचा रंगतदार संगम अनुभवायला मिळणार आहे. संगीतप्रेमी आणि भाविकांसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.
यात्रोत्सवाच्या आयोजनात माऊली साऊंड सिस्टिम कामतगा व गुंजी, तसेच श्री गुंजी कला व सांस्कृतिक मंच, गुंजी ग्रामस्थ, आणि पंच समिती यांचा मोठा सहभाग आहे.
सर्वांनी या भव्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.