हलगा श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारासाठी देणगी बुक प्रकाशन सोहळा उत्साहात
हलगा (ता. खानापूर) : हलगा येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी स्थापन करण्यात आलेल्या जीर्णोद्धार समितीच्या वतीने देणगी पावती पुस्तकांचे प्रकाशन सोहळा रविवार दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रणजीत कल्लाप्पा पाटील यांनी भूषविले. कार्याध्यक्ष सुनील मारुती पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन युवराज पाटील, प्रमोद पाटील, गणपती पाटील, कुमार फटाण व महाबळेश्वर फटाण यांच्या हस्ते करण्यात आले.
देणगी पावती बुकांचे प्रकाशन माहेरवाशी भगिनी प्रतिभा पाटील (जळगे), कल्पना बोकडे (मजगाव), पूजा भोसले (नंजिनकोडल), पूजा पाटील (हलगा), मलप्रभा पाटील (हलगा) यांच्या शुभहस्ते पार पडले.
कार्यक्रमाला समितीचे सदस्य संजय ईश्रान, नागेश फटाण, रमेश पुंडलिक गुरव, पुंडलिक कृष्णाजी पाटील, आनंद फटाण, गंगाराम पाटील, विनोद फटाण, आप्पांना मारुती ईश्रान, संतोष रुपन, रवी रुपन, महाबळेश्वर पाटील, नागेशी गावडू पाटील, वसंत सुतार, विजय ईश्रान आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर सनदी यांनी केले.
🌸 प्रमुख देणगीदारांचे योगदान खालीलप्रमाणे :
- दीड टन लोखंड – श्री पुंडलिक रुद्राप्पा बगडी (उद्योजक, गोवा)
- एक टन लोखंड, दोन ट्रिप खडी व ₹12,001 – श्री प्रकाश दत्तात्रय कडगावकर (सिव्हिल इंजिनिअर)
- ₹50,555 – श्री उमजी हणमंत देवकर (उद्योजक, पुणे)
- 50 पोती सिमेंट – सौ. सपना रुद्राप्पा कल्लन्नवर, मु. देवलती (माहेरवाशी भगिनी)
- 2,000 विटा – श्री संदीप मारुती पाटील (सिव्हिल इंजिनिअर)
- एक ट्रिप खडी – श्री राजू पांडुरंग गुरव (बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर)
- 50 पोती सिमेंट – श्री रणजीत कल्लाप्पा पाटील (अध्यक्ष, मंदिर समिती)
- ₹11,111 – कु. रोशन शांताराम पाटील (नेव्ही) व रोहिणी शांताराम पाटील (माहेरवाशी भगिनी)
- ₹10,555 – श्री गजानन अशोक पाटकर (गोवा)
- ₹5,555 – कु. सुरज सतिश रुपण, मु. हलगा
- ₹5,100 – सौ. अंकिता नारायण फटाण (माहेरवाशी भगिनी)
- ₹5,001 – सौ. शिवानी (नकुशा) शंकर पाटील, मु. आसोगा (माहेरवाशी भगिनी)
- 50 पोती सिमेंट – श्री विनोद विठ्ठल फटाण (निवृत्त सैनिक)
- 3,000 विटा – श्री नामदेव मारुती खरूजकर (उद्योजक)
- 25 पोती सिमेंट – श्री पांडुरंग ज्योतिबा सुतार, हलगा
- 101 पोती सिमेंट – श्री अनिल अमृत ईश्रान व श्री ज्ञानेश्वर सुब्राव ईश्रान
याशिवाय अनेक देणगीदारांनी वाढदिवस, स्मृतिदिन आदी निमित्तांनी रोख स्वरूपात लाखो रुपयांचे उदार योगदान दिले.
🙏 श्री महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी देणाऱ्या सर्व दानशूर भक्तांचे समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

