खानापूरवार्ता आयोजित घरगुती मखर सजावट स्पर्धा 2025
खानापूर: 2024 मध्ये मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे आणि अनेक कलाप्रेमींच्या विनंतीमुळे ‘खानापूरवार्ता’ पुन्हा एकदा जिजाऊ गणेश मंडळाच्या सहकार्यासोबत घरगुती मखर सजावट स्पर्धेचे आयोजन करत आहे.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश घरोघरी दडलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आहे, ही स्पर्धा केवळ एक संधी नसून, आपल्या कलेला योग्य व्यासपीठ मिळवून देणारी एक अनोखी संधी आहे.

या वर्षीच्या स्पर्धेत विजेत्यांसाठी जिजाऊ गणेश मंडळाच्या सहकार्यासोबत खास आणि आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. पहिले पारितोषिक ₹7777 (ॲड. ईश्वर घाडी यांच्या सौजन्याने), दुसरे पारितोषिक ₹5555 (जिजाऊ गणेश मंडळाच्या सौजन्याने), तिसरे पारितोषिक ₹3333 (सुरेश भाऊ जाधव यांच्या सौजन्याने), चौथे पारितोषिक ₹1111 (प्रसाद पाटील, गर्लगुंजी यांच्या सौजन्याने) आणि पाचवे बक्षीस ₹555 (जिजाऊ गणेश मंडळाच्या सौजन्याने) आहे. याव्यतिरिक्त, सहाव्या ते दहाव्या क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. याच बरोबर सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणे खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त तुमच्या घरी बनवलेल्या सुंदर मखराचा एक 30 ते 60 सेकंदांचा उभा (व्हर्टिकल) व्हिडीओ तयार करायचा आहे आणि तो 8088101547 या नंबरवर मेसेज करायचा आहे. तुमच्या कलेला योग्य दाद मिळवण्यासाठी आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची ही सुवर्णसंधी आहे. तर, वाट न पाहता, आजच स्पर्धेत सहभागी व्हा!

