खानापूर
खानापूरच्या नंदगड हद्दीत दुचाकी अपघात, युवकाचा मृत्यू
खानापूर – यलापुर मार्गावरील बिडी नजीक जुंजवाड वळणावर सोमवारी सायंकाळी एक दुचाकी अपघात घडला. सुसाट वेगाने धारवाडच्या दिशेने जात असताना, एका दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्यामुळे तो अपघातात ठार झाला. मृत दुचाकीस्वाराचे नाव अयुम अकबर नाईक (वय 26 वर्ष), रा. कोट्टूर, तालुका-जील्हा धारवाड आहे.
सदर अपघात खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला. अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील आरोग्य चिकित्सा केंद्रात आणण्यात आला आहे. घटनेची नोंद नंदगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
नंदगड पोलीस स्थानकाचे पीएसआय एस. एस. बदामी, हवालदार पांडू तुरमुरी आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.