खानापूर

अनमोड घाटात बस आणि कारची जोरदार टक्कर – काही जण किरकोळ जखमी

रामनगर, 28 जून:
आज सकाळी अंदाजे 9 वाजण्याच्या सुमारास बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटात एक भीषण अपघात झाला. हुबळीहून पणजीकडे जाणारी प्रवासी बस आणि गोव्याहून कर्नाटकाच्या दिशेने येणाऱ्या कारची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात कारमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कारचे पुढचे भाग पूर्णतः क्षतिग्रस्त झाले असून, बसच्या एका कोपऱ्यालाही नुकसान झाले आहे.

हा अपघात अनमोड घाटातील अकारीचे पोस्टजवळ घडला असून, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर परिस्थितीची गंभीरता स्पष्ट होते. ही घटना रामनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी अपघातस्थळी तात्काळ पोहोचून पुढील तपास सुरू केला आहे.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?