खानापूर

नेरसे येथे हरणाची शिकार : नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

खानापूर, 27 जून 2025 – गुरुवार, 26 जून रोजी सायंकाळी 5 वाजता, लोंढा झोन अंतर्गत येणाऱ्या नेरसे बीटमध्ये एक सांबर जातीच्या हरणाची शिकार करण्यात आल्याची माहिती वन विभागाला मिळाली. खात्रीशीर माहितीच्या आधारे वन अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान, नेरसे वन क्षेत्रातील सर्वेक्षण क्रमांक 102 लगतच्या खाजगी मालकीच्या सर्वेक्षण क्रमांक 104/2 मध्ये ही बेकायदेशीर शिकार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणात एकूण नऊ आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्या विरोधात लोंडा झोन गुन्हा क्रमांक 07/2025-26 अंतर्गत भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 मधील कलम 9, 39, 44, 50 आणि 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींना आज शुक्रवार, 27 जून रोजी न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

ही कार्यवाही बेळगाव परिमंडळाचे माननीय मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण आणि माननीय उपवनसंरक्षक मारिया क्रिस्टू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत खानापूर उपविभागाच्या सहायक वनसंरक्षक सुनीता निंबर्गी, विभागीय वन अधिकारी श्रीकांत पाटील (खानापूर), सय्यदसाबा नदाफ (भीमगड), उप-विभागीय वन अधिकारी वाय. एस. पाटील (लोंडा) तसेच खानापूर व भीमगड झोनमधील कर्मचारी सहभागी झाले होते.

वन विभागाने वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी घेतलेली ही ठोस कारवाई आदर्शवत असून, वन्यजीव शिकार करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचा इशारा या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाला आहे.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?