खानापूर
खानापूर-हेमाडगा-अनमोड रस्ता बंद; हालात्री नदी पुल पाण्याखाली
खानापूर-हेमाडगा-अनमोड मार्गावरील मणतुर्गा नजीक असलेल्या हालात्री नदी पुलावर पाणी आल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. काल दिवसभर आणि रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
वाहनधारक व प्रवासी मणतुर्गा-असोगा-खानापूर या पर्यायी मार्गाचा वापर करत आहेत. मात्र, असोगा रस्त्यावर रेल्वे भुयारी मार्गाचे काम सुरू असून तेथे साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याच्या बाजूची माती ढासळत आहे. त्यामुळे या मार्गालाही धोका निर्माण झाला असून, तातडीने उपाययोजना न केल्यास तो मार्गही बंद होण्याची शक्यता आहे.