खानापूर

रावसाहेब वागळे व चव्हाण पॉलिटेक्निक महाविद्यालयात,योग दिन उत्साहात साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालय आणि व्ही. वाय. चव्हाण पॉलिटेक्निक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक आणि अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन रावसाहेब वागळे महाविद्यालयाचे सचिव श्री. राजू नाईक, प्राचार्या शरयू कदम, चव्हाण पॉलिटेक्निकचे प्राचार्य शिरूर सर आणि पतंजली योगपीठाच्या अध्यक्षा निर्मला देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक करताना राजू नाईक सर म्हणाले की, “मानवी जीवनात योगाचे स्थान अनन्यसाधारण आहे. योग म्हणजे शरीर व मन यांचे संयोग असून, तो मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक समतोल साधण्याचे प्रभावी साधन आहे.”

या वेळी पतंजली योगपीठाच्या वतीने योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रात्यक्षिक देण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा. संदीप पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. गुंडू कोडला सरांनी केले.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?