खानापूर
झाडाखाली थांबलेल्या मुलीवर वीज कोसळून मृत्यू – बेळगावात दुर्दैवी घटना
बेळगाव: तालुक्यातील खनगाव गावात बुधवारी दुपारी मुसळधार पावसात 15 वर्षांच्या मुलीवर वीज कोसळून तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत मुलीचे नाव आत्सा जमादार असे आहे.
शाळेला सुट्टी असल्याने ती आईसोबत शेतात कामासाठी गेली होती. पाऊस सुरू होताच ती शेतातून बाहेर पडून झाडाखाली उभी राहिली. त्याचवेळी आकाशातून वीज कोसळली आणि तिच्यावर आदळली. या दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला.
मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. ही घटना मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.