खानापूर

2 वर्षांच्या मुलीची आई बेपत्ता, पतीचे शोधासाठी आवाहन

खानापूर वार्ता: खानापूर तालुक्यातील अबनाळी गावातील छकुली तुकाराम गवाळकर (वय 21) माहेर बांदेकरवाडा ही विवाहित महिला 1 मार्चच्या रात्रीपासून बेपत्ता आहे. ती इस्लामपूर-साखराळे येथे पती आणि दोन वर्षांच्या मुलीसह राहत होती.

छकुली गवाळकर हीचे पती तुकाराम गवाळकर हे इस्लामपूर येथे गवंडी मिस्त्री म्हणून काम करतात. इस्लामपूर येथील घरातून 1 मार्च रोजी रात्री 12:30 वाजता छकुली हिने पतीला न सांगता घराला बाहेरून कडी लावून घर सोडले आहे. त्यानंतर ती कुठे गेली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

या प्रकरणी पतीने इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खानापूर-बेळगांव किंवा गोवा भागात छकुली गवाळकर हीची माहिती मिळाल्यास 9731631835 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पतीने केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या