आरोग्य

धक्कादायक! ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीममध्ये चक्क सापडले मानवी बोट!

आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोट सापडल्यानंतर मुंबईतील रहिवाशाची दहशत

मुंबई – आजकाल आपण अनेक गोष्टी ऑनलाईन मागवतो. परंतु, मुंबईतील एका तरुणाने ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीम कोनमध्ये मानवी बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. फिंगर चिप्स आपण ऐकले आहे पण फिंगर आईस्क्रीमचा हा प्रकार धक्कादायक आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. Mumbai resident panics after human finger found in ice cream cone

ब्रँडन सेराओ (वय 27) याने बुधवारी झेप्टो अॅपवरून ऑनलाइन आईस्क्रीम कोण मागवला. पण, आईस्क्रीम मिळाल्यावर त्याला धक्काच बसला. ब्रँडनने बटरस्कॉच आईस्क्रीममधून कव्हर काढून आईस्क्रीम खाण्याचा आनंद घ्यायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याच्या जिभेवर काहीतरी जोरात आदळले. त्यामुळे त्याने कठीण भाग बाहेर काढला आणि त्याला दोन सेंटीमीटर लांबीचे मानवी बोट सापडले. ब्रॅंडन स्वत: डॉक्टर असल्याने हे बोट मानसाचे असल्याचे लगेच लक्षात आले.

FInger inside icecreame

एफपीजेने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी ब्रँडनने झेप्टो अॅपवरून(Zepto App) काही वस्तू मागवल्या. त्यावेळी तिच्या बहिणीने त्याला बटरस्कॉच आईस्क्रीम मागवण्यास सांगितले. आईस्क्रीमची ऑर्डर मिळाल्यावर त्याला धक्काच बसला. finger in ice cream mumbai

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रँडन यांनी मालाड पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली आहे. ही बोट जप्त करण्यात आली असून ती फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. आईस्क्रीम कुठे बनवले जाते आणि पॅकेजिंग कोणत्या ठिकाणी केले जाते, याचा शोध घेतला जाणार आहे. finger-in-icecream

Woman finds human finger inside ice cream ordered online

मुंबई में आइसक्रीम के अंदर से निकली इंसान की कटी उंगली

Human finger found in ice cream cone ordered from Mumbai

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते