रेशनकार्डधारकांना आता पैसे न देता तांदूळ, आजपासून वितरण
बेळगाव: राज्यातील रेशनकार्डधारकांना आता पैसे न देता थेट 10 किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारीपासून प्रतिमाणशी 10 किलो तांदूळ देण्याचा आदेश अन्न व नागरी पुरवठा खात्याला देण्यात आला होता. मात्र, आदेश येण्यापूर्वीच रेशन वितरण प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता मार्चमध्ये गेल्या महिन्यातील 5 किलो आणि या महिन्यातील 10 किलो, असे एकूण 15 किलो तांदूळ देण्याचा सल्ला रेशन दुकानदारांना देण्यात आला आहे. त्यानुसार आजपासून (दि. 12) तांदूळ वितरण सुरू होणार आहे.
तांदळाच्या किमतीत घट; सरकारचा मोठा निर्णय
अन्नभाग्य योजना जुलै महिन्यात सुरू झाली. याअंतर्गत प्रतिमाणशी 5 किलो तांदूळ देण्यासाठी सरकारने 34 रुपये प्रतिकिलोप्रमाणे प्रति व्यक्ती 170 रुपये जमा केले होते. मात्र, यंदा झारखंडमध्ये भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने तांदळाचे दर घसरले. सध्या तांदूळ 22 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध असल्याने राज्य सरकारने पैसे न देता थेट तांदूळ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागरिकांना प्रति किलो 12 रुपयांची बचत होणार आहे.
रेशनकार्ड दुरुस्ती सुरूच
रेशनकार्ड दुरुस्तीचे काम अद्याप सुरू असल्याने काही लाभार्थी अन्नभाग्य आणि इतर योजनांपासून वंचित राहात आहेत. रेशनकार्ड दुरुस्तीची सुविधा ग्रामवन, कर्नाटक वन आणि बेळगाव वन येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यापुढे दर महिन्याला 170 रुपयांच्या बदल्यात 5 किलो तांदूळ देण्यात येणार आहे. मार्च महिन्यातील 10 किलो तांदूळ आणि फेब्रुवारी महिन्यातील 5 किलो मिळून एकूण 15 किलो तांदूळ लाभार्थ्यांना वितरित केला जाईल.
ration card application form
karnataka ration payment
