खानापूर

अज्ञात वाहनाच्या धडकेत पिडीओचा मृत्यू

बेळगांव: अथणी तालुक्यातील अनंतपूर गावाच्या हद्दीत मंगळवारी संध्याकाळी एका दुर्दैवी अपघातात ग्रामपंचायत विकास अधिकारी (PDO) अशोक सनदी (वय 48, नागनूर पी. ए. गाव) यांचा मृत्यू झाला.

अशोक सनदी हे अनंतपूर गावातून तांवशी मार्गे जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या दुचाकीचे मागील भाग पूर्णपणे चुरडले गेले असून, कोणीतरी मागून धडक दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ते गेल्या 20 वर्षांपासून वेगवेगळ्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत होते. मात्र, मागील सहा महिन्यांपासून आजारी असल्याने घरी विश्रांती घेत होते. वैयक्तिक कामासाठी अनंतपूर गावात गेले असताना घरी परत येत असताना हा अपघात झाला.

घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते