बातम्या

नवनिर्वाचित खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी, शुक्रवारी खानापुरात

खानापूर: कारवार लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी Vishweshwar Hegde Kageri शुक्रवार 14 जून 2024 रोजी खानापूर येथे उपस्थित राहणार असून ते शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

विश्वेश्वर हेगडे-कागेरी हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या संपूर्ण लोकसभा क्षेत्रात दौरे करत आहेत. यावेळी ते खानापूर तालुक्याचा दौरा करणार असून, शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता ते खानापूर तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्या बैठकीत खानापूर तालुक्याच्या विकासकामांबाबत चर्चा करून निर्णय घेणार आहेत.

विश्वेश्वर हेगडे-कागेरी हे पहिल्यांदा खासदार म्हणून तालुक्यात येत असल्याने खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने खानापूर येथील श्री राजा शिवछत्रपती शिवस्मारक खानापूर येथे दुपारी दोन वाजता जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सर्व भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्व हितचिंतकांनी दुपारी बरोबर 2 वाजता शिवस्मारकयेथे उपस्थित राहावे. अशी विनंती भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा सरचिटणीस धनश्री सरदेसाई, सरचिटणीस गुंडू टोपिनकट्टी, जनरल सेक्रेटरी बसु सनिकोप व आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Newly elected MP of Karwar Lok Sabha Constituency Vishweshwar Hegde Kageri will be present at Khanapur on Friday 14 June 2024.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते