खानापूर: बस काय थांबेना, शाळा कॉलेजला जाता येईना, बेकवाड व भागातील विद्यार्थ्यांचे त्रास
खानापूरवार्ता: दरवर्षी प्रमाणे यंदाही खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना बसच्या कमतरतेमुळे शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.
खानापूर-हलियाळ मार्गावरील बेकवाड व भागातील विद्यार्थ्यांनाही बसमुळे भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. बेकवाड, झुंजवाड, हाडलगा, बंकीबसरीकट्टी, कोणकिकोप या पाच गावचे विद्यार्थी बेकवाड क्रॉसला असलेल्या बस स्टॉप येथे येऊन थांबलेले असतात. सकाळी 8 वाजल्यापासून याठिकाणी 100 ते 150 विद्यार्थ्यांची गर्दी झालेली असते. पण हलियाल बिडी येथून फुल होऊन येणाऱ्या बस मुळे येथील मुलांना चढायला जागाचं नसते. त्यामूळे यामुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
मागील वेळी याठिकाणी आंदोलन झाले होते आणि या आंदोलनंतर या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या सर्व बसेस या ठिकाणी थांबण्यास परवानगी देण्यात आली होती. तरीही या मार्गावरून बसेस फुल होऊन येत असल्याकारणाने बेकवाड क्रॉसच्या विद्यार्थ्यांना बस भेटणे अशक्य होत आहे.
तरी खानापूरचे आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर यांनी यामधे लक्ष घालून येथील विद्यार्थांसाठी बसची सोय करावी. तसेच बस डेपोने अधिक बसचा मार्ग काढावा नसेल तर परत आंदोलनाचा इशारा येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी दिला आहे.🙏
व्हिडीओ पहा