खानापूर: पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या संन्नहोसुर व भंडरगाळी या दोन गावच्या श्री महालक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात होणार आहे. या यात्रेची पूर्णनियोजित बैठक आज संन्नहोसुर गावामध्ये पार पडली. या बैठकीत आमदार विठ्ठलराव हलगेलर यांनी दोन्ही गावच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये, पाणी, रस्ते,गटारी, शाळा सुविधा, विद्युत लाईट ,गावातील मंदिराचे रंग रांगोटी, व इतर उपक्रम महालक्ष्मी यात्रे निमित्त दोन्ही गावामध्ये राबविण्यात येणार असल्याचे सांगीतले.
यावेळी यात्रा कमिटीचे सेक्रेटरी श्री. बळिराम पाटील, तोपिनकट्टी ग्रामपंचायत P.D.O. राजयराम हलगेकर, श्री मारुती गुरव , लक्ष्मण तीरविर ,लक्ष्मी तिरविर,अनिता मुर्गोड , शिवाजी कंरबळ, रघुनाथ पाटके, भरमाणी पाटील, निवृत्ती पाटील, परशराम पाटील, व दोन्ही गावचे पंच कमिटी, गावातील नागरिक, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
