खानापूर

खानापूर RSS चे पथसंचलन 1300 हून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग

खानापूर: प्रति वर्षाप्रमाणे विजयादशमीचे औचित्य साधून आज 13 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3.30 वाजता खानापूर तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने खानापूर शहरात पथसंचलन व सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खानापूर स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावरून दुपारी साडेतीन वाजता सुरू करण्यात आलेले हे पतसंचलन खानापूर स्टेशन रोड शिवस्मारक चौक बसवेश्वर चौक, केंचापुर गल्ली, चौराशी मंदिर, गुरव गल्ली अशा विविध मार्गावरून काढण्यात आले. त्यानंतर याची स्वामी विवेकानंद शाळेच्या मैदानावर सांगता करण्यात आली.

या पथसंचलनात जवळपास 1300 हून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग झाला होता. या पथसंचलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख, पदाधिकारी, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, यासह अनेक संघाचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायंकाळी 5.30 वाजता बेळगाव विभाग व्यवस्था प्रमुख सुरेश मोहिते यांचे बौद्धिक विचार झाले.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?