खानापूर

सर्व सरकारी शाळा टिकवण्याकरता भव्य अभियान


खानापूर: 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता शिवस्मारक खानापूर येथे आपली मातृभाषा सरकारी शाळा टिकवण्याची जनजागृती करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे.

या भव्य दिव्य सभेमध्ये आपले कर्तव्य आणि कर्तुत्व ज्यांनी सतरा वर्षे अधिक शिक्षणाचा बढावा व्हावा  आणि विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळावे असा संघर्ष करून उपक्रम राबवनारी संघटना म्हणजे *ज्ञानवर्धनी* आणि या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष *श्रीमान पीटर डिसोझा* हे या सभेला उपस्थितीत राहणार आहेत.

आपण सर्वांनी प्रत्येक गावच्या शाळा सुधारणा समिती ,शिक्षणप्रेमी, समाजसेवक व हितचिंतक यांनी या सभेला उपस्थित राहावे असे विश्वभारती कला क्रीडा संघटनेचे अध्यक्ष व माजी सैनिक अनिल देसाई यांनी सांगितले आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते