बातम्या

आता शनिवारी भरणार पूर्ण दिवस शाळा

बेळगांव: मुसळधार पावसामुळे आठवडाभर बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. सदर 6 दिवसांची सुट्टी संबंधित सर्व शाळांनी येत्या दि. 10 ऑगस्ट ते दि. 21 सप्टेंबर 2024 या कालावधीत दर शनिवारी भरून काढावी, असा आदेश शिक्षण खात्याने बजावला आहे.

या आदेशानुसार आता येत्या दि. 10, 17, 24 आणि 31 ऑगस्ट, 14 व 21 सप्टेंबर 2024 शनिवारच्या दिवशी शाळा अर्धा दिवस न राहता पूर्ण दिवस सुरू राहणार आहेत. शिक्षण खात्याने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शाळा 9.45 ते 4.45 या वेळेत भरते.

saturday full day school in belgavi district

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?