खानापूर

अतिवृष्टीने पडझड घरांचा माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्याकडून पाहणी दौरा

खानापूर शहरासह बिडी भागात केली पाहणी पीडितांना तात्काळ निधी मंजूर करून देण्याची तहसीलदारांना केली सूचना

खानापूर: अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली असून तालुक्यात अनेक लोक बेघर झाले आहेत. यामुळे अशा लोकांना तात्काळ पर्याय निधी मिळून द्यावा यासाठी शासन दरबारी पावले उचलण्यात आली आहेत असे माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सांगितले.

यासंदर्भात डॉ. अंजली निंबाळकर यांनी मंगळवारी खानापूर तालुक्यातील अनेक पडझड झालेल्या घरांची पाहणी केली व त्या कुटुंबांना दिलासा दिला खानापूर शहरातील अनेक घरे त्याचप्रमाणे बिडी गोल्याळी चापगाव आदी भागांमध्ये पाहणी दौरा केला.

यावेळी माजी आमदार म्हणाल्या ” पूर्ण खानापूर तालुक्यात अतिवृष्टीने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये 200 घरे मध्यम प्रमाणात पडलेली आहेत आणि 39 घरं पूर्णपणे पडलेली आहेत. त्या पूर्ण पडलेल्या घरांना   मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आणि काँग्रेस सरकारने सांगितल्या प्रमाणे 1 लाख 20 हजार रूपये तसेच एक घर बांधून दिलं जाणार आहे. 

त्या पुढे म्हणाल्या  “तालुक्यामध्ये अशी कोणाचीही पडझड झालेली असेल तर कृपा करून तहसीलदार ऑफिसला  फोटोसहीत पूर्ण बँक अकाउंट सोबत पेपर द्या. कोणत्याही एजंट कडे किंवा कोणी काही सांगत असेल तर विश्वास ठेऊ नका यासाठी कोणाला पैसे देऊ नका” असेही त्या म्हणाल्या

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?