मॅगी नूडल्स खाल्ल्याने 10 वर्षीय मुलाचा मृत्यू, एकाच कुटुंबातील 6 जण रुग्णालयात
तसेच मॅगी नूडल्स खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याने कुटुंबातील सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना उत्तरप्रदेश येथील सीएचसी पूरनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राहुल नगर भागात घडली.
उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यात ‘मॅगी’ या लोकप्रिय इन्स्टंट नूडल्स खाल्ल्याने एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच मॅगी नूडल्स खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याने कुटुंबातील सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुलाने आणि कुटुंबीयांनी तांदळासोबत मॅगी नूडल्स खाल्ल्यामुळे फूड पॉयझनिंग झाल्याचे सांगितले जात आहे.
हजारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राहुल नगर परिसरात ही घटना घडली. दरम्यान, या कुटुंबाची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना सीएचसी पूरनपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेशी संबंधित दृश्यांमध्ये कुटुंबातील सदस्यांवर पीलीभीतमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे दिसत आहे.
या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून कडक उन्हाळ्यात शिळे अन्न खाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
ही घटना उघडकीस येताच आणि मॅगी खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊन १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी पसरताच स्थानिक पत्रकारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही बातमी शेअर केली.
या कुटुंबावरही उपचार सुरू असून मॅगी नूडल्स खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याने सहा जणांना पोटदुखी आणि अतिसाराचा तीव्र त्रास झाला.
भातातून मॅगी खाण्याची हि पहिलीच बातमी आणि ऐकायला हि जरा विचित्र वाटत असली तरी अशी घटना घडली आहे. राहुल नगर येथे राहणाऱ्या मनिराज यांची मुलगी सीमा आपल्या तीन मुलांना घेऊन देहरादूनहून आपल्या माहेरला आली होती. या घटनेदिवशी त्यांनी घरी जेवणासाठी भात आणि सोबत मॅगी देखील केली होती. सीमा आणि तिच्या तीन मुलांव्यतिरिक्त त्यांची बहीण, भाऊ आणि त्याच्या पत्नीनेही भात सोबत मॅगी खाल्ली.
हा घडलेला प्रकार कॅमेऱ्यात कैद कसून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओ मध्ये रुग्णाला एका खासगी रुग्णालयात सदर पीडित कुटुंबियांवर उपचार केल्याचे दिसत आहे.
या घटनेचे वृत्त ऑनलाईन कळताच लोकांना भीती वाटू लागली. सोशल मीडियावर अनेकजण इतरांना फास्ट फूड निवडताना सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. पिलीभीतमध्ये या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी अधिक माहिती घेण्यासाठी खासगी रुग्णालयात धाव घेतली.