बातम्या

रावसाहेब वागळे कॉलेज मध्ये अकरावी विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा संपन्न..

खानापूर: येथील रावसाहेब वागळे महाविद्यालयात पि. यु. सी. प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व जिमखाना कमिटीचा पदग्रहण सोहळा शनिवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी प्राचार्या शरयू कदम  होत्या. प्रमुख अतिथी म्हणून लोकमान्य सोसायटी चे जेष्ठ संचालक श्री. गजानन धामणेकर  माजी नगरसेवक व संचालक श्री पंढरी परब, लोकमान्य शिक्षण विभागाचे शिक्षण समन्वयक डॉ. डी एन मिसाळे प्रा. डी  व्ही पाटील, प्रा शंकर गावडा व्यासपीठावर उपस्थित होते..

विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.संचालक श्री गजानन धामणेकर यांच्या हस्ते सरस्वती मातेचे फोटो पूजन करण्यात आले. श्री पंढरी परब, डॉ डी एन मिसाळे याच्या हस्ते दिप्रज्वलन करण्यात आले..प्रमुख अतिथी या नात्याने बोलताना मा. नगरसेवक पंढरी परब म्हणाले.

विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय निश्चित करून प्रचंड मेहनत घेतली पाहिजेत. वेळेच योग्य नियोजन करून अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळवता येते.गरिबी ही आर्थिक निकषावर नसून आपल्या विचारावर अवलंबून आहे..कोणत्याही परिस्थितीत कर्तृत्व सिद्ध करण्याची ती एक संधी आहे.. डॉ. डी एन मिसाळे यांनी विद्यार्थ्यांनां  यश प्राप्त  करण्यासाठी खडतर परिश्रम घेतले पाहिजेत. भविष्यात येणाऱ्या  आव्हानांना तोंड देण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही.

ज्ञानामुळेच असंख्य संकटावर मात करता येते त्यासाठी सखोल ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. गजानन धामणेकर प्राचार्या शरयू कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले..यावेळी सन 2024 /25 सालासाठी जिमखाना कमिटी निवड केली.कॉलेज चे जनरल सेक्रेटरी  म्हणून कु. ज्ञानेश्वर पाटील व उप जनरल सेक्रेटरी कु.ज्ञानेश्वर मादार,कॉलेज ची विद्यार्थिनी प्रतिनिधी कु समिक्षा वाणी.क्रीडा विभाग कु शाम सुतार, कु.शारदागावडा. सांस्कृतिक विभाग कु. गणेश चौडी, परीक्षा विभाग कु. संतोषी उसिनकर, ग्रंथालय विभाग कु. प्रीतिका पाटील, सहल विभाग ओंकार गांवकर. वर्ग प्रतिनिधी. कु सुमित देसाई कु. श्रीनाथ पाटील कु. बाबू गावडे कु. दिशा वंजारे यांची निवड केली. सर्व प्रतिनिधीना प्रा. प्रकाश पाटील यांनी शपथ देवविली.विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक कु. संतोषी उशिणकर हिने केले तर सूत्रसंचालन कु. समिक्षा वाणी हिने केले. तर आभार आर एस पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सोनी गुंजिकर प्रा. संदीप पाटील, प्रा. गुंडू कोडला, प्रा. इमिलिया फर्नांडिस व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले..

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते