बातम्या

खानापूरचा मुलगा बंगळूरची मुलगी, इंस्टाग्रामवर प्रेम, 12 कोटींची संपत्ती

खानापूर: इंस्टाग्रामच्या माध्यमातून वाढलेल्या संभाषणाचे प्रेमात रूपांतर होऊन विवाहबद्ध झालेल्या बेंगलोरची युवती आणि खानापूरचा युवक अशा एका प्रेमी युगुलाने युवतीच्या घरच्यांच्या विरोधामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांकडे संरक्षणाची मागणी केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर येथील रोहित कोलकार, व्यवसाय इलेक्ट्रिशियन याने साधारण वर्षभरापूर्वी इंस्टाग्रामवर पाठविलेल्या फ्रेंड रिक्वेस्टला बेंगलोर येथील प्रियांका गौडा हिने सहज म्हणून प्रतिसाद दिला. मात्र त्यानंतर उभयतांमध्ये इंस्टाग्रामवर संपर्क वाढवून त्याचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. प्रियांकाच्या आई-वडिलांचे तिच्या लहानपणीच निधन झाले. प्रियांकाची कोटींची मालमत्ता असून सध्या ती मामाकडे आहे. प्रियांकापेक्षाही मामाचा तिच्या ₹ 10-12 कोटींच्या मालमत्तेवर डोळा होता असे प्रियांका सांगते.

अलीकडे एका लग्नानिमित्त बेळगावला आलेली प्रियांका रोहितच्या घरी वास्तव्यास होती. त्यावेळी तिला रोहितचे घर आणि घरातील लोकांचा स्वभाव खूपच आवडला आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रोहित सध्या बेळगाव तालक्यामधील एका गावात राहत असून तो इलेक्ट्रिशियनचे काम करतो.

आज मंगळवारी सकाळी खानापूर तालुक्यातील पारिश्वाड येथील एका मंदिरात विवाहबद्ध झालेल्या रोहित आणि प्रियांका या नवदांपत्याने थेट जिल्हा पोलीस प्रमुखांचे कार्यालय गाठले.

रोहित आणि प्रियांका यांच्या लग्नाला रोहितच्या घरच्यांची संमती असली तरी प्रियांकाच्या सख्ख्या मामाचा विरोध होता. मामा तिचे शाळेतील दाखले,कोणतीही कागदपत्रे देण्यास तयार नाही. त्यामुळे प्रियांकाने मामाकडील मालमतेसाठी तक्रार केली आहे.

रोहित व प्रियांका या नवदाम्पत्याची तक्रार आणि मागणीची दखल घेतल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, सज्ञान युवक व युवती स्वतःहून परस्पर संमतीने विवाहबद्ध झाले असल्यास आणि कांही कारणास्तव त्यांनी संरक्षणाची मागणी केल्यास कायद्यानुसार ती पुरवणे आमचे कर्तव्य आहे. त्यानुसार रोहित व प्रियांका यांच्या बाबतीत आम्ही ते कर्तव्य पार पाडत आहोत.

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार अपडेट

त्या मुलीचे हे तिसरे लग्न आहे..
त्याशिवाय तिच्याकडे कोटींची मालमत्ता असल्याबाबत शंका आहे. याबाबत पोलीस प्रमुखांनी खुलासा केला आहे. अधिक माहितीची प्रतीक्षा..

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते