खानापूर

पंढरपूर येथे तरुणाचा मृत्यू, कुप्पटगिरी येथे महिलेचा मृत्यू 

खानापूर : कुप्पुटगिरी गावातील वारकरी मंडळींच्या वतीने बुधवार दिनांक 17 रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे अयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये टाळ वाजवत असताना एका 72 वर्षीय वारकरी महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.

दुपारी एक वाजल्यापासून सुरू असलेल्या या दिंडीत महिला ह.भ. प. यल्लू उर्फ बायजा यशवंत पाटील (वय 72) टाळ वाजवत सहभागी झाली होती त्यानंतर 4 च्या सुमारास महिलेला हृदयविकाराचा धक्का बसला आणि तिचा मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

तरुणाचे पंढरपूरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

वडगाव सोनार गल्ली येथील एका तरुणाचा पंढरपूर येथे हृदयविकाराने मृत्यू झाला सदर घटना बुधवारी सकाळी दहा वाजता घडली. प्रवीण सुतार असे त्यांचे नाव आहे. 

प्रवीण बेळगांव वडगाव परिसरातील वारकऱ्यांना घेऊन आपल्या वाहनातून पंढरपूर येथे गेले होते. सकाळच्या सत्रात आपली कामे आटोपून ते आपल्या पार्क केलेल्या वाहनात बसले होते. यादरम्यान त्यांचे हृदयाघाताने निधन झाले.

वारकरी दर्शन संपवून पार्क केलेल्या वाहनाकडे आल्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. या घटनेने वडगाव परिसरातील वारकऱ्यांवर शोककळा पसरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते