सोशल मीडियावर प्रेम: नंतर गरोदर, आता संशयास्पद मृत्यू
बेळगाव(मच्छे) : मित्राच्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकून सोशल मीडियावर रील बनवणारी तरुणी गरोदर महिला रहस्यमयपणे मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे.
यामध्ये मच्छे येथील विवाहितेचा मृत्यू झाला आहे. यामुळे या प्रकरणांत पतीसह सासरच्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंजुळा (वय 22) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तर पती बोरेश बाळप्पा गड्डीहोळी याच्यासह 7 जणांच्या विरोधात बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, म्हैसूर येथील मंजुळा (वय 22) हिची इन्स्टाग्रामवर बेळगाव येथील मच्छेतील रहिवासी बोरेश बाळप्पा गड्डीहोळी याच्याशी ओळख झाली.
या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दीड वर्षापूर्वी दोघांनी लग्न केले. मात्र, लग्न करताना मंजुळा हिने घरी न सांगता विवाह केला. विवाहानंतर ती बेळगावला मच्छे येथे पती बोरेश गड्डीहोळीसोबत राहत होती. मात्र, तीन ते चार महिन्यांपासून तिला बोरेशसह सासरचे लोक कामाला जाण्यासाठी मारहाण करत होते. तिला कौटुंबिक हिंसेला सामोरे जावे लागत होते. तसेच वेळेवर जेवण देण्यात येत नव्हते. त्याशिवाय ती चार महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे तिला गर्भपात करून घेण्यासाठी सासर लोकांकडून त्रास दिला जात होता. शिवाय याला प्रतिसाद न दिल्यामुळे जिवे मारू, अशी धमकी देण्यात येत होती.
यातूनचं 11 जुलैला दुपारी 4 सुमारास तिचा खून केल्याचा आरोप मंजुळाची आई हेमा हिने बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यानुसार 7 जणांच्या विरोधात बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
त्यामध्ये पती बोरेश बाळप्पा गड्डीहोळी याच्यासह कमलव्वा बाळप्पा गड्डीहोळी, बाळप्पा निंगाप्पा गड्डीहोळी, शिवानंद बाळप्पा गड्डीहोळी व रेश्मासह अन्य दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगाव ग्रामीण पोलिस पुढील चौकशी करत आहेत.