बेळगावचे नवे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगांव: राज्य सरकारने नुकताच राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यात बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा समावेश आहे.नितेश पाटील यांची बदली बेंगळूर येथे लघु मध्यम उद्योग विभागाचे संचालक म्हणून करण्यात आली आहे. तर हेस्कॉम चे एमडी मोहम्मद रोशन यांची बेळगावच्या नूतन जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मोहम्मद रोशन 2015 सालच्या बॅचचे युवा आयएएस अधिकारी आहेत. तात्कालीन जिल्हाधिकारी एम.जी हिरेमठ यांच्या सेवानिवृत्तीनंतर 5 मे 2022 रोजी नितेश पाटील यांनी बेळगाव जिल्हाधिकारी पदाचा अधिकार स्वीकारला होता. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी नितेश पाटील यांची बदली बेंगलोर येथे झाली आहे.
तर नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे युवा आयएएस अधिकारी आहेत लवकरच ते पदभार स्वीकारणार आहेत
मोहम्मद रोशन 2015 सालच्या बॅचचे युवा आयएएस अधिकारी आहेत. तात्कालीन जिल्हाधिकारी एम.जी हिरेमठ यांच्या सेवानिवृत्तीनंतर 5 मे 2022 रोजी नितेश पाटील यांनी बेळगाव जिल्हाधिकारी पदाचा अधिकार स्वीकारला होता. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी नितेश पाटील यांची बदली बेंगलोर येथे झाली आहे.
तर नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे युवा आयएएस अधिकारी आहेत लवकरच ते पदभार स्वीकारणार आहेत.
belgavi new dc
who is new dc of Belgavi
Belgaum Dc