खानापूर

खानापूर येथील एक आशेचे किरण फाउंडेशनची भावनिक हाक – 7 महिन्याच्या बाळासाठी मदतीचे आवाहन

खानापूर: खानापूर तालुक्यातील एक आशेचे किरण फाउंडेशन यांनी एका निष्पाप 7 महिन्यांच्या बाळासाठी समाजासमोर मदतीचे आवाहन केले आहे. मोक्षग्ना नावाचे हे बाळ सध्या SMA Type-1 (स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी) या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे.

या आजारामुळे बाळाच्या शरीरातील स्नायू हळूहळू निकामी होत आहेत. सध्या मोक्षग्नाला स्वतःहून हात-पाय हलवता येत नाहीत. दूधसुद्धा पाईपच्या सहाय्याने द्यावे लागत असल्याने कुटुंब अत्यंत कठीण परिस्थितीत दिवस काढत आहे.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, मोक्षग्नासाठी “ZOLGENSMA” हे इंजेक्शन अत्यावश्यक असून तेच सध्या उपलब्ध असलेले जीवनरक्षक उपचार आहे. मात्र हे इंजेक्शन अमेरिकेतून मागवावे लागणार असून त्याची किंमत तब्बल ₹9 कोटी इतकी आहे.

मोक्षग्नाचे वडील सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील असून मुलाच्या उपचारासाठी ते दिवस-रात्र संघर्ष करत आहेत. बाळाची 24 तास काळजी घ्यावी लागत असल्याने त्यांनी नोकरीसुद्धा सोडली आहे. घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची बनली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी एक आशेचे किरण फाउंडेशनचे डायरेक्टर व फाउंडर सिताराम मारुती सुतार, फाउंडर व डायरेक्टर बाळाप्पा मारुती नंद्रनकर तसेच सदस्य राजू देसाई यांनी प्रत्यक्ष बेंगळोर येथे जाऊन मोक्षग्नाच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी बाळाची परिस्थिती प्रत्यक्ष पाहून मदतीचे आवाहन केले आहे.

फाउंडेशनकडून जमा झालेली मदत प्रत्यक्ष कुटुंबाच्या हातात चेक स्वरूपात देण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले. आजपर्यंत विविध संस्था, NGO आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीने सुमारे ₹1 कोटी 80 लाख निधी जमा झाला असला तरी अजून मोठ्या रकमेची आवश्यकता आहे.

डॉक्टरांनी “जितक्या लवकर इंजेक्शन दिले जाईल, तितकी मोक्षग्नाच्या जगण्याची शक्यता वाढेल,” असे स्पष्ट केल्याने आता वेळ अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

फाउंडेशनने नागरिकांना आवाहन करताना सांगितले की,
“₹10, ₹20, ₹50, ₹100 किंवा शक्य असेल तितकी मदत करा. तुमची छोटीशी मदतसुद्धा एका निष्पाप बाळाचे आयुष्य वाचवू शकते.”

https://www.instagram.com/reel/DWdJ0AKka7X/?igsh=MWF2bHJuMTBoMzZzNA==

💳 मदतीसाठी बँक तपशील:

  • Account Number: 7564689860
  • IFSC Code: IDIB000U013

🙏 एक आशेचे किरण फाउंडेशनचे आवाहन:

“हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. माणुसकी अजून जिवंत आहे हे सिद्ध करूया आणि मोक्षग्नाला नवजीवन देण्यासाठी एकत्र येऊया.” 🙏

http://m-lp.co/lilayla?utm_medium=campaign_page_share&utm_source=copy

तुम्ही बाळाबद्दल अधिक माहिती गुगल करूनही पाहू शकता.   सर्व रिपोर्ट उपलब्ध

अधिक माहितीसाठी संपर्क : सिताराम मारुती सुतार: 7619367159

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या