रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा.
खानापूर: लोकमान्य सोसायटी lokmanya socity संचलित रावसाहेब वागळे पदवी पूर्व महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला खानापूर येथील पतंजली योगपीठाचे प्रशिक्षक श्री शंकर गुरव सौ पार्वती गुरव, हेमांगी खासनीस, दीपा गुरव यांनी विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले. प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या शरयू कदम आणि पतंजली योगपीठाचे योग प्रशिक्षक यांच्या हस्ते दिप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. vagale college khanapur
प्रा. शरयू कदम यांनी योगाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले..योग प्रशिक्षक पार्वती गुरव आणि हेमांगी खासनीस यांनी योगाचे फायदे तसेच धावपळीच्या युगात योग का आवश्यक आहे त्याचा शरीरावर आणि मनावर होणारा सकारात्मक परिणाम जीवन आनंदी बनविण्यास कसा उपयोगी पडतो. याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. शंकर गावडा यांनी केले..सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि लोकमान्य सोसायटी चे कर्मचारी उपस्थित होते..