पतीच्या पैशांतून 28 लाखांची उधळपट्टी; ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या पत्नीवर गुन्हा
बेंगळुरू : सायबर क्राईम पोलिसांनी एका महिलेवर पतीच्या खात्यातून जवळपास ₹28 लाखांची ऑनलाइन खरेदी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महिलेच्या आई-वडिलांवरही कारवाई करण्यात आली आहे.
तक्रार बेंगळुरूतील एका डॉक्टरने केली असून, त्यांचा आरोप आहे की त्यांची पत्नी (जी स्वतःही डॉक्टर आहे) मार्च 2023 मध्ये विवाह झाल्यानंतर, जून 2023 ते नोव्हेंबर 2024 या काळात त्याचा टॅब वापरून खात्यातील पैसे खर्च केले. या कालावधीत पत्नीने 2,500 हून अधिक वस्तू खरेदी केल्या असून, त्यांची एकूण किंमत ₹28,74,545.42 इतकी आहे. या वस्तू प्रामुख्याने तिच्या आई-वडिलांसाठी घेतल्या गेल्याचे पतीचे म्हणणे आहे.

डॉक्टर पतीचा आरोप आहे की पत्नीने हे सर्व त्याच्या नकळत आणि ठरवून कट रचून केले असून, कुटुंबासाठी पैसे वळवून त्याची फसवणूक केली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी पत्नी व तिच्या आई-वडिलांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 61 (गुन्हेगारी कट), कलम 318 (फसवणूक) आणि कलम 319 (भेसूरपणा करून फसवणूक) यांखाली गुन्हा नोंदवला आहे.
सध्या पोलिस तपास सुरू असून, व्यवहारांची पडताळणी करून महिलेचा सहभाग किती आहे हे तपासले जात आहे.
ಪತಿಯ ಖಾತೆಯಿಂದ ₹28 ಲಕ್ಷ ಆನ್ಲೈನ್ ಶಾಪಿಂಗ್; ಪತ್ನಿ ವಿರುದ್ಧ ಸೈಬರ್ ಕ್ರೈಂ ಪೊಲೀಸರ ದೂರು
ಬೆಳಗಾವಿ : ಪತಿಯ ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾತೆಯಿಂದ ಪತ್ನಿಯೊಬ್ಬಳು 28 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಮೊತ್ತವನ್ನು ಆನ್ಲೈನ್ ಶಾಪಿಂಗ್ಗೆ ಖರ್ಚು ಮಾಡಿದ ಪ್ರಕರಣ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿದೆ. ಈ ಸಂಬಂಧ ಸೈಬರ್ ಕ್ರೈಂ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಪತ್ನಿ ವಿರುದ್ಧ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿದೆ.
ಮಾಹಿತಿಯಂತೆ, ಪತಿಯ ಖಾತೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದ ಹಣವನ್ನು ಅನುಮತಿ ಪಡೆಯದೆ ಪತ್ನಿಯು ವಿವಿಧ ಆನ್ಲೈನ್ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ಗಳ ಮೂಲಕ ಖರೀದಿಗೆ ಬಳಸಿದ್ದಾಳೆ. ಇದರಿಂದ ಪತಿಯು ಪೊಲೀಸರಿಗೆ ದೂರು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದು, ತನಿಖೆ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ.
ಸೈಬರ್ ಕ್ರೈಂ ಪೊಲೀಸರು ಈ ಪ್ರಕರಣವನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಿದ್ದು, ಮುಂದಿನ ತನಿಖೆ ಮುಂದುವರಿಸಿದ್ದಾರೆ.