खानापूर

लग्न ठरत नसल्याच्या मानसिक त्रासातून आत्महत्या – युवकाचा मृत्यू

खानापूर: लग्न ठरत नसल्याच्या मनस्तापातून नैराश्यात गेलेल्या पिरनवाडी येथील 32 वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

बसवराज वीराप्पा जुलपी (वय ३२) असं मृत युवकाचं नाव असून, तो मूळचा हिरेनंदिहळ्ळी (ता. कितूर) येथील असून सध्या मारुतीनगर, पिरनवाडी येथे राहत होता.

30 मार्च रोजी दुपारी त्याने विष प्राशन केले होते. त्यानंतर त्याला तातडीने सायंकाळी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच शुक्रवारी मध्यरात्रीनंतर त्याचा मृत्यू झाला.

बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते