उडपी: राज्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई असताना उडपी शहरात एक चमत्कारिक घटना घडली आहे. या गरमीच्या दिवसात परकाळा परिसरातील एक घरगुती विहीर पाण्याने भरून वाहतेय.
उडपी येथील परकाळा परिसरातील भवानीकट्टे गरडी भागातील घरगुती विहिरी उन्हाळ्यामुळे कोरड्या पडल्या आहेत. मात्र, संजीव नाईक यांच्या मालकीची याच परिसरातील एक घराजवळील विहीर यंदा पाण्याने ओव्हरफ्लो झाली असून भरून वाहत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीत अचानक खड्डा पडल्याने हि विहीर पाण्याने ओसंडून वाहत असून ती शेजारच्या पाण्याच्या प्रवाहाला जोडलेली आहे. या विहिरीला ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील 3 ते 4 विहिरींची पाणीपातळी वाढत आहे. या विहिरीला सिंचनासाठी तीन विद्युत तर एक डिझेल पंप बसवलेला आहे.
भूकंपामुळे विहिर पाण्याने भरून वाहतेय
विहिरीला पाणी येण्याचे कारण म्हणजे 2017 साठी उन्हाळ्यात या भागात झालेला सौम्य भूकंप. सामाजिक कार्यकर्ते गणेश राज सरलेबेट्टू यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूगर्भशास्त्रज्ञांनी घटनास्थळाला भेट दिली असून आणि असा विश्वास व्यक्त केल आहे की या भूकंपामुळेचं हे पाणी लेटेराइटथर मुळे पाणी वाहू लागले आहे, परिणामी विहिरीतील पाण्याची पातळी वाढली आहे.
कर्नाटक राज्यात विक्रमी तापमान असताना राज्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितल्याप्रमाणे राज्याची राजधानी बेंगळुरू येथे दररोज 500 दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता भासत आहे. पाणीटंचाईचे कारण गेल्या वर्षभरातील अत्यंत कमी पाऊस असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी राज्यात सरासरीपेक्षा 18 टक्के कमी पाऊस झाला होता.