खानापूर

पाण्याचा अंदाज चुकला, 21 वर्षीय युवकाचा मृत्यू

बेळगांव:तिलारी येथील ग्रीन व्हॅलीजवळील धबधब्यात बेळगाव येथील 21 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाल्याची घटना गुरुवारी (दि. 3 एप्रिल) उघडकीस आली. अभिनव चंद्रशेखर अंकलगी (वय 21, मूळ गाव वडगेर, ता. यड्रामी, जि. गुलबर्गा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

या घटनेची माहिती अभिनवचे वडील चंद्रशेखर अंकलगी यांनी चंदगड पोलिसात दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनव हा बेळगावातील एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. बुधवारी तो आपल्या चार मित्रांसोबत फिरण्यासाठी तिलारी परिसरात गेला होता. ग्रीन व्हॅलीजवळील धबधब्याच्या ठिकाणी सर्वजण पाण्यात उतरले असता, अभिनवला पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता न आल्याने तो पाण्यात बुडाला.

त्याच्या मित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडला नाही. त्यानंतर चंदगड येथील ‘पास रेस्क्यू फोर्स’कडून शोधमोहीम सुरू करण्यात आली.

मात्र तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविली असता दुपारी एक वाजता त्याचा मृतदेह सापडला. चंदगड पोलिसात घटनेची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अंबुलकर करीत आहेत.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते