खानापूर : लोकमान्य एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या औचित्याने महाविद्यालयातील एनएसएस स्वयंसेवकांनी खानापूर बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.

कार्यक्रमाचे उद्घाटन खानापूर नगराध्यक्षा सौ. मिनाक्षी बैलूरकर व बसस्थानक प्रमुख श्री. संतोष बेनकोणकोप यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, वृक्षसंवर्धन व सामाजिक जबाबदारीबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. शरयू कदम अध्यक्षस्थानी लाभल्या. एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. सोनी गुंजीकर यांनी स्वागत केले. प्रा. गुंडू कोडला, प्रा. प्रकाश पाटील, आर. एस. पाटील, इमिलिया फर्नांडिस, बसस्थानक कर्मचारी श्री. विठ्ठल कांबळे व श्री. परशराम मादार यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. शंकर गावडा यांनी केले.