खानापूर

खासदार कागेरी यांनी घेतली खानापूर तालुका  ‘अधिकाऱ्यांची हजेरी’

khanapur: कारवार लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी MP Vishweshwar Hegde Kageri  यांनी खानापूर तालुका पंचायत सभागृहात शुक्रवारी 14 तारखेला प्रथमच खानापूर तालुक्यातील सरकारी अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव हलगेकर होते. व्यास पीठावर तहसीलदार प्रकाश गायकवाड, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी विराणा गौडा आदी उपस्थित होते. kageri in khanapur

प्रास्ताविक व स्वागत प्रकाश गायकवाड यांनी केले. नवनिर्वाचित खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांचा तालुका पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

तालुक्याचा आढावा घेताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश किवडसनवार यांना खासदार कागेरी म्हणाले की, खानापूर येथे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्याबाबत कारवार लोकसभा मतदारसंघात खूप गाजावाजा झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. त्याचबरोबर शासकीय रुग्णालयातील समस्या, औषध वाटप, रुग्णालयात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा यावर चर्चा केली.

खानापूर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या उद्घाटनाला खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी, आमदार विठ्ठलराव हलगेकर हे उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MP Kageri attends Taluka Khanapur ‘officials’,

वनक्षेत्रात विजेचे खांब उभारण्यास वनविभागाचा विरोध आहे असे हेस्कॉम विभागाच्या अधिकाऱ्याने सांगताच खासदार कागेरी म्हणाले की, वन विभागाने हेस्कॉम विजेच्या खांबांच्या बांधकामात अडथळा आणू नये. माणुसकी जपून काम करावे.

यावेळी खासदार कागेरी यानी यांनी प्रत्येक तालुका अधिकाऱ्यांची शाळा घेतली. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या समस्या मांडून कामाचा आढावा घेतला.

यावेळी तालुका बीईओ, पशुसंवर्धन अधिकारी, कृषी अधिकारी, पीडब्ल्यूडी, नगरपंचायत, केएसआरटीसी, पोलिस विभाग, बालकल्याण विभाग, फलोत्पादन विभाग आदी उपस्थित होते. मत्स्यपालन खाते, पीडीओ अधिकारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन पीडीओ अनंत भिंगे यानी यांनी केले. आभार तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते