खानापूर

कौलापुर ग्रामस्थांचा निषेध: आरोग्य अधिकारी निलंबित करण्याची मागणी

कौलापुर (ता. खानापूर) : येथील श्री लोपेश्र्वर देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांनी मंगळवार, दि. ३० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी, सीईओ, पोलिस अधिकारी आणि इतर प्रशासनिक अधिकाऱ्यांना निवेदन देत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली.

निवेदनात म्हटले आहे की, क्वालिटी अ‍ॅनिमल फीड्स प्रा. लि. (हॅचरी प्रकल्प) या कंपनीला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जे फेसीबीलिटी सर्टिफिकेट दिले आहे, ते चुकीच्या माहितीवर आधारित आहे. या सर्टिफिकेटमध्ये कौलापुर हे गाव कंपनीपासून २ किमी पूर्वेकडे असल्याचे नमूद करण्यात आले आहे, तसेच आजूबाजूला शेतीचे क्षेत्र असल्याचे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात कंपनीचे स्थान गावापासून अवघ्या ३० फूट अंतरावर आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, चुकीची माहिती देऊन या हॅचरी प्रकल्पासाठी कंपनीकडून परवानगी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे गावकऱ्यांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

तसेच, संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. “असे अधिकारी आमच्या जीवाशी खेळत आहेत,” असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी मागणी केली की, या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे आणि कंपनीला दिलेले फेसीबीलिटी सर्टिफिकेट तात्काळ रद्द करावे. कौलापुर गावाच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि भविष्यात असा अन्याय पुन्हा घडू नये, याची खबरदारी घ्यावी.

यावेळी श्री लोपेश्र्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री. गंगाराम बावदाने तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते