खानापूर : येथील फुटबॉल प्रेमींना एक आनंदाची बातमी! विद्यानगर एफसी तर्फे आयोजित VFC चषक सिझन-3 या अत्यंत उत्साहवर्धक 6+2 अ साईड दिवसरात्र फुटबॉल स्पर्धेचा भव्य शुभारंभ 30 मे शुक्रवार रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत होणार आहे. पहिले आणि दुसरे बक्षीस माजी आमदार अरविंद पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे.

ही स्पर्धा साई स्पोर्ट्स अकॅडमी टर्फ, मराठा मंडळ शाळा मैदान, खानापूर येथे रंगणार असून, उद्घाटन सोहळ्यास सर्व फुटबॉलप्रेमी, खेळाडू, आणि नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आयोजकांनी कळवले आहे.
स्पर्धेची ट्रॉफी आणि नियोजन यामुळे आधीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिझन 1 व 2 ला मिळालेला भरघोस प्रतिसाद लक्षात घेता, यंदाचा सिझन-3 अधिक रंगतदार होणार आहे, अशी खात्री आयोजकांनी व्यक्त केली आहे.
आपली उपस्थिती स्पर्धेला अधिक गौरवशाली बनवेल!
संपर्क:
हर्ष – 9035487080
मारुती – 7411239324
हर्षल – 7619657009