अवकाळी पावसाचा तडाखा, वीट व्यावसायिकांची उडाली धांदल
बेळगावसह खानापूर तालुक्यात पावसाचे आगमन!
खानापूर : कडक उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना आज अचानक पडलेल्या पावसाने थोडासा दिलासा दिला आहे. आज संध्याकाळी 5.30 च्या सुमारास तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला असून, अचानक पडलेल्रया पावसाने वीट भट्टी कामगारांमध्ये धांदल उडाली आहे. रस्त्यावर झाडांच्या लहान-मोठ्या फांद्या तुटून पडत आहेत. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीटभट्ट्यांना फटका बसला आहे.

खानापूर तालुक्यातील अनेक भागांत आज पावसाने हजेरी लावली. उन्हाच्या तीव्रतेपासून काही प्रमाणात शांतता मिळाली असली तरी काहींना याचा फटका बसला आहे. शेतीनंतर महत्त्वाचा मानला जाणारा वीट व्यवसाय गेल्या दोन-तीन महिन्यांपासून चांगल्या गतीत सुरू होता. होळी पौर्णिमेनंतर व्यवसाय काहीसा कमी होत असला, तरी अनेक व्यावसायिक उन्हाळ्याच्या कालावधीत वीट उत्पादनात गुंतलेले असतात. अशा परिस्थितीत या अवकाळी पावसामुळे वीट भिजण्याची शक्यता निर्माण झाली असून, व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.