खानापूर

अनमोड घाटात 16 चाकी ट्रक जळून खाक

रामनगर: अनमोड घाटात कोळसा वाहून नेणारा 16 चाकी ट्रक आगीत जळून खाक झाला. या घटनेत ट्रकचे सर्व 16 टायर आणि कोळसाही जळून नष्ट झाला. फोंडा येथील अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले, परंतु तोपर्यंत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला होता. या दुर्घटनेत अंदाजे 70 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

created

घटनेची नोंद मोलेम पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. हा ट्रक होस्पेट, कर्नाटक येथून गोव्यातील अमोना येथे कोळसा वाहतूक करत होता. अनमोड घाटात गोवा हद्दीत मोलेमजवळ ट्रकचा पुढील टायर पंचर झाल्यामुळे चालक टायर बदलण्याच्या तयारीत होता. त्याच वेळी मागील टायर फुटला आणि अचानक आगीचा भडका उडाला. काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले आणि संपूर्ण ट्रक जळून खाक झाला.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते