क्राईम

जांबोटी-पिरनवाडी रोडवर भीषण अपघात, किणये येथील तरुण ठार

जांबोटी : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. पिरनवाडी जांबोटी रोडवरील बामणवाडी क्रॉसजवळ हा अपघात झाला. सूरज दीपक पाटील (वय ३०, रा. किणये असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बेळगाव चोर्ला रस्त्यावरील बामणवाडी क्रॉसजवळ गोव्याहून माल वाहून नेणारी आयचर ट्रक आणि बेळगावहून किणयेकडे जाणारी दुचाकी यांच्यात गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास समोरासमोर झालेल्या अपघातात किणये येथील तरुणाचा मृत्यू झाला.

हा अपघात इतका भीषण होता की, मृत सूरजची दुचाकी 50 फुटांपर्यंत फेकली गेली. त्यानंतर आयशर विजेच्या खांबावर आदळली. अपघातानंतर लगेचच सूरजला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचाराचा फायदा न झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

तो (MR) म्हणून काम करत होता, सूरजच्या पश्चात वडील, आई आणि दोन भाऊ असा परिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातला कारणीभूत ठरलेल्या अवजड वाहनाचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या