खानापूर

नंदगड शाळेतील वर्गावर कोसळलं झाड; सुदैवाने विद्यार्थ्यांचा बचाव

नंदगड | प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील नंदगड येथील जेसीएस संकुलातील उर्दू शाळेवर सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात एक  आंब्याचं झाड कोसळलं. या घटनेत शाळेच्या एका वर्गखोलीचे संपूर्ण नुकसान झाले असून,  छप्पर व भिंतीचे पडल्या. मात्र सुदैवाने ही दुर्घटना शाळा सुरू होण्यापूर्वीच घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सदर वर्गखोलीत दररोज विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मात्र मंगळवारी सकाळी शिक्षक व विद्यार्थी शाळेत पोहोचल्यावर त्यांना झाड कोसळलेले भयावह दृश्य दिसून आले. याची माहिती त्वरित नंदगड वनविभागाच्या कार्यालयाला देण्यात आली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत झाड हटवण्याचे काम सुरू केलं.

या घटनेची माहिती मिळताच खानापूरचे क्षेत्रीय शिक्षणाधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यांनी वर्गखोलीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद घेतली व त्वरित दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे सांगितले.

शाळेतील इतर वर्गखोल्यांची अवस्था देखील अत्यंत खराब असून, त्या विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी योग्य नाहीत. त्यामुळे शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे तातडीने वर्गखोली दुरुस्ती व सुरक्षित तात्पुरत्या व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

या घटनेमुळे पालक व ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

ನಂದಗಡ: ಶಾಲೆಗೆ ಬೃಹತ್ ಮರ ಬಿದ್ದು ಕೊಠಡಿ ಹಾನಿ
ನಂದಗಡದ ಜೆಸಿಎಸ್ ಆವರಣದ ಉರ್ದು ಶಾಲೆಗೆ ಸೋಮವಾರ ರಾತ್ರಿ ಸುರಿದ ಭಾರೀ ಮಳೆಯಲ್ಲಿ ಬೃಹತ್ ಆಕಾರದ ಮಾವಿನ ಮರ ಉರುಳಿ ಬಿದ್ದು, ಒಂದು ಶೈಕ್ಷಣಿಕ ಕೊಠಡಿ ಸಂಪೂರ್ಣ ಹಾನಿಗೊಂಡಿದೆ. ನಸುಕಿನ ವೇಳೆಯಲಿ ಘಟನೆ ಸಂಭವಿಸಿದ್ದರಿಂದ ಯಾವುದೇ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಅಥವಾ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಹಾನಿಯಾಗಿಲ್ಲ. ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಪರಿಶೀಲನೆ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಸ್ಥಳೀಯರು ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಕರು ಶೀಘ್ರ ದುರಸ್ತಿ ಹಾಗೂ ತಾತ್ಕಾಲಿಕ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕಲ್ಪಿಸಬೇಕೆಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ.


Nandgad:  tree falls on school building, classroom damaged
A huge mango tree fell on an Urdu school building at JCS Campus in Nandgad due to heavy rains on Monday night, causing complete damage to one classroom. Fortunately, the incident occurred before school hours, and no injuries were reported. Forest and education department officials visited the site for inspection. Locals and teachers have urged for immediate repairs and temporary arrangements.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या