जांबोटी क्रॉस ते रामगुरवाडी दरम्यान वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
खानापूर: तालुक्यातील रामगुरवाडी येथे श्री सातेरी माऊली व ग्रामदेवता श्री हुडगम्मा देवीचा यात्रोत्सव 4 फेब्रुवारी 2025 पासून बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू आहे. विशेष म्हणजे तब्बल 21 वर्षांनंतर हा यात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे गावात मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत.
भाविकांची गर्दी वाढल्याने जांबोटी क्रॉस ते रामगुरवाडी या मार्गावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. मात्र या मार्गावर पोलिस बंदोबस्त नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

बाचोळी क्रॉसजवळील शनाया कार्यालयात सुरू असलेल्या कार्यक्रमामुळेही वाहतूक कोंडीचा त्रास अधिक वाढला आहे. तसेच मलप्रभा क्रीडांगणावर सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यामुळे नागरिक रस्त्यावर थांबून सामने पाहत असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहतूक व्यवस्थापनासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, असे नागरिकांकडून मागणी केली जात आहे.

Traffic snarls between Jamboti Cross and Ramgurwadi