टी-20 वर्डकप 2024 : टी-20 विजेतेपदासाठी भारताने बनवला ‘विराट’ संघ, कोण कोणत्या भूमिकेत?
आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 साठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे 1 जूनपासून सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा संघ निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोहित शर्माला संघाचा कर्णधार तर हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या निवड समितीची बैठक झाली. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 1 जूनपासून सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या वर्डकप साठी 15 खेळाडूंचा संघ निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीयांच्यात अहमदाबाद येथे बैठक झाली. सर्व संघांना 1 मेपर्यंत 15 खेळाडूंचा संघ सादर करायचा आहे. भारतानेही आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
भारताचा ‘अ’ गटात सामील करण्यात आला आहे. यामध्ये पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि सहयजमान अमेरिकाचा समावेश करण्यात आला आहे. न्यू यॉर्कच्या नवनिर्मित नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 5 जूनपासून आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाची मोहीम सुरू होणार आहे. आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 साठी न्यूझीलंडने आपला 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला.
टी-20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ( Team India squad For T20 World Cup 2024):
रोहित शर्मा (कर्णधार)
हार्दिक पंड्या (उपकर्णधार)
यशस्वी जयस्वाल
विराट कोहली
सूर्यकुमार यादव
ऋषभ पंत (यष्टीरक्षक)
संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
शिवम दुबे
रवींद्र जडेजा
अक्षर पटेल
कुलदीप यादव
युजवेंद्र चहल
अर्शदीप सिंग
जसप्रीत बुमराह
मोहमद सिराज
हे आहेत चार राखीव खेळाडू:
टी-20 विश्वचषक 2024 साठी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघासह 4 राखीव खेळाडूंची ही निवड केली आहे. राखीव खेळाडूंचा खर्च बीसीसीआय किंवा आयसीसी उचलणार आहे.
शुभमन गिल
रिंकू सिंग
खलील अहमद
आवेश खान
17 महिन्यांनंतर या खेळाडूचे संघात पुनरागमन
भारतीय निवड समितीने टी-२० विश्वचषक २०२४ साठी यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांचा टीम इंडियात समावेश केला आहे. रिषभ पंत 17 महिन्यांनंतर टीम इंडियात परतला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या कार अपघातानंतर रिषभ पंत टीम इंडियाबाहेर होता. पण तो नुकताच आयपीएलमधून क्रिकेटच्या मैदानावर परतला असून आता तो टीम इंडियाकडून खेळण्यास तयार झाला आहे.
भारत-पाकिस्तान सामना 9 जूनला
टी-20 विश्वचषक 2024 मधील भारत-पाकिस्तान चा हायव्होल्टेज सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये खेळला जाणार आहे. नुकतेच आयसीसीने न्यूयॉर्क स्टेडियमचे फोटो शेअर केले आहेत. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ चे यजमानपद वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तपणे भूषवत आहेत.