खानापूर
खानापूरमध्ये आजपासून प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठनाचा शुभारंभ
खानापूर: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) शाखा खानापूर येथे सद्गुरु प.पु. गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादाने “बालसंस्कार विभाग” अंतर्गत प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठनाचा प्रारंभ उद्या, शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे.

हे स्तोत्र पठन पुढील 28 दिवस दररोज सकाळी ठीक 7:00 वाजता श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र खानापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिकाधिक बालसेवेकऱ्यांनी या पवित्र उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

