खानापूर: तालुक्यातील बिडी गावातील जिवाजी वसंत बिडकर (वय 65) या व्यक्तीने बुधवारी दि.14 रोजी सायंकाळी खानापूर मलप्रभा नदीच्या पुला वरील जॅकवेल नजीक नदीत उडी टाकुन आत्महत्या केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खिशातील आधार कार्ड नदी काठाजवळील जॅकवेल जवळ ठेऊन नदीत उडी मारली. सदर व्यक्ती वनखात्यात वाचमन म्हणून काम करत होते. मयत व्यक्तीच्या पत्नीने देखील मागच्या वर्षी आत्महत्या केली होती. याच व्यापातून त्याने आत्महत्या केली असावी असे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

יו