खानापूर

कर्नाटक SSLC निकाल जाहीर, 22 विद्यार्थ्यांनी 625/625 गुण मिळवले

कर्नाटक SSLC 10वी निकाल 2025 लाईव्ह: निकाल karresults.nic.in वर सक्रिय, 22 विद्यार्थ्यांनी 625/625 गुण मिळवले

कर्नाटक माध्यमिक शिक्षण व मूल्यमापन मंडळाने (KSEAB) 2025 चा SSLC (इयत्ता 10 वी) निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ karresults.nic.in या ठिकाणी आपला रोल नंबर आणि जन्मतारीख वापरून लॉगिन करावा.

कर्नाटकचे शालेय शिक्षण व साक्षरता मंत्री मधु बंगारप्पा यांनी बंगळुरू येथील KSEAB कार्यालयात निकाल अधिकृतपणे जाहीर केला. यंदाचा एकूण उत्तीर्ण टक्केवारी 62.34% आहे, जी गेल्या वर्षाच्या 53% च्या तुलनेत 9% नी वाढलेली आहे. विशेष म्हणजे यंदा 22 विद्यार्थ्यांनी 625 पैकी 625 गुण मिळवत शंभर टक्के गुण मिळवले आहेत.

SSLC परीक्षा 21 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यातील विविध केंद्रांवर घेण्यात आली होती. यंदा जवळपास 9 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.


कर्नाटकमधील SSLC निकाल 2025 कसा पाहाल?

विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे स्टेप्स फॉलो कराव्यात:

  1. अधिकृत संकेतस्थळ karresults.nic.in ला भेट द्या
  2. होमपेजवर ‘SSLC Result 2025’ या लिंकवर क्लिक करा
  3. आपला रोल नंबर आणि जन्मतारीख टाका
  4. निकाल पाहा आणि मार्कशीट डाउनलोड करा
  5. भविष्यासाठी प्रिंटआउट घेऊन ठेवा

विद्यार्थ्यांनी आपली वैयक्तिक माहिती आणि गुण नीट तपासून पाहावेत. जर कुठेही चूक आढळली, तर तत्काळ KSEAB शी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते